अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील महात्मा फुले शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील स्वयं शासन कार्यक्रमांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनीच शाळेचा कार्यभार उत्कृष्टरित्या सांभालळा व विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सुद्धा केला.यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते यावेळी सर्वप्रथम भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले . व स्वयंशासन कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी कार्यक्रमामध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे त्याचप्रमाणे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या संचालिका साधना भोपळे यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. त्याचप्रमाणे श्यामशील भोपळे व साधना भोपळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच . स्वयंशासन विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. तसेच आजच्या स्वयंशासन कार्यक्रम मध्ये मुख्याध्यापकांची भूमिका वर्ग सातवीचा विद्यार्थी नयन कट्यारमल यांनी स्वीकारली होती .व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भक्ती गिरी व ईश्वरी कट्यारमल यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन समीक्षा सोनोने या विद्यार्थिनीने केले.आज त्यांनी विद्यार्थी नाही तर शिक्षक म्हणून प्रत्येक वर्गात क्लास घेऊन विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रतनबाई ताराचंद कानुंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक सोळंके होते. तर प्रमुख पाहुणे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्यामशील भोपळे व संचालिका साधना भोपळे ह्या होत्या. त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र सोळंके ,पर्यवेक्षिका सीमा बांगर तसेच गोकुळा झापर्डे ,अंकुश हिवराळे,आरती इंगळे,सीमा धुमाळे,गायत्री इंगळे ,आनंद राऊत,विद्यालयाचे लिपिक योगेंद्र राऊत तसेच शिपाई सुनील धुरदेव , विद्यालयाच्या पोषण आहार निर्मात्या सुमन राऊत , त्याचप्रमाणे स्वयंशासन कार्यक्रम चे सर्व शिक्षक ,तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
