हिवरखेडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी द्या.पक्षु प्रेमीसह नगराध्यक्षा धडकल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील आठवडी बाजारातील स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यात गेल्या कित्येक दिवसांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नाही, त्यामुळे आजारी गुरांची या दवाखान्यात गैर सोय होत असल्याचे पशु प्रेमी सांगत आहेत, या दवाखाण्याचा तात्पुरता कारभार पशु वैद्यकीय अधिकारी अबोली कथे यांच्याकडे आहे परंतु त्या इथे आठवड्यातून एकच दिवस सेवा देऊ शकतात अशा त्या म्हणाल्या,त्यामुळे इतर दिवस येथे एकच कर्मचारी असतो.एक कर्मचारी शेकडो जनावरांनवर कसा उपचार करेल असा सुद्धा प्रश्न पशु प्रेमिना पडतो,दिनांक ९ सप्टेंबरच्या दुपारी अनेक पशुपालक आपल्या आजारी गायी म्हशी घेऊन दवाखान्यात गेले होते परंतु एकटा कर्मचारी कुठल्या कुठल्या गुरांनवर उपचार करेल येथे जबाबदार वैद्यकीय अधिकारी नसल्याने या दवाखान्यात गोंधळ झाला, ही बाब पशु प्रेमी यांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्या लक्षात आणून दिली सामाजिक कार्यकर्ते तत्काळ या स्थळी धावून गेले व शासनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी द्यावा अशी मागणी केली यावेळी प्रदीप पाटील, निखिल कराळे, सागर उरकडे,अन्सार खा, तन्वीर शेख, जहिर खा, अर्जुन खिरोडकार यांनी ही मागणी रेटून धरली व वेळ प्रसंगी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला,विशेष म्हणजे या दवाखान्यातील कर्मचारी राजेश वायकर हे १५ दिवसांनी सेवानिवृत्त होतील मग हा पशु वैद्यकीय दवाखाना काय राम भरोसे राहणार का असा सुद्धा प्रश्नन? पशु पाल्यांना पडला,
पशु प्रेमीच्या या मागणीत हिवरखेड नगरपरिषदच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्षा यांनी समर्थन केले, पशु वैद्यकीय दवाखान्यात जाऊन आपल्या सहकाऱ्यान सोबत भेट दिली व आम्ही सुद्धा नगरपरिषदच्या वतीने कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मिळावा म्हणून पाठवपुरावा करू, यावेळी नगराध्यक्षा सौ सुलभा दुतोंडे, उपाध्यक्षा प्रतिभा येऊल, नगरसेवक प्रथमेश नाठे,समाजसेवक रमेश दुतोंडे, संदीप इंगळे, रवी वाकोडे, सुदाम राऊत यांनी येथे उपस्थिती दर्शनूं पशु पाल्यांच्या समस्या मार्गी लावण्यात तत्परता दाखविली,
