बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आढावा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिली मदतीची हमी.


 बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला  आढावा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिली मदतीची हमी.

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी)

पावसात पडलेला खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  आज बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिली.बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज 23 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते .  पाण्यामुळे सुकून गेलेल्या  पिकांची पाहणी केली यावेळी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड माजी आमदार संजय रायमुलकर शशिकांत खेडेकर सहसंपर्कप्रमुख शांताराम दाणे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत संतोष डिवरे अमोल अंधारे चेतन पाटील यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख महिलाआघाडी प्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. काही शेतांमध्ये १०० टक्के नुकसान झाले असून शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी  शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पीकाचे नुकसान याविषयी माहिती घेतली.पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले...संकटाच्या काळात बळीराजाने टोकाचे पाऊल उचलू नये अशी आवाहन  शेतकरी बांधवांना केले

Previous Post Next Post