अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठित; साक्षी उंबरकर अध्यक्षपदी..श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून निवड प्रक्रिया उत्साहात...


 अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठित; साक्षी उंबरकर अध्यक्षपदी..श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून निवड प्रक्रिया उत्साहात...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी निवड प्रक्रिया शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बी.ए. व बी.कॉम. शाखेतील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रा. विनोद बावस्कर, प्रा. नागरे व प्रा. उनडकाट यांची उपस्थिती होती.नवनियुक्त कार्यकारिणीत अध्यक्षपदी साक्षी उंबरकर, उपाध्यक्षपदी निकिता उगले, सचिवपदी सुप्रिया दाभाडे, सहसचिवपदी कोमल नळकांडे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी गौरव अद्रळे व तेजस्विनी पारस्कर यांची निवड करण्यात आली.याशिवाय सभासद म्हणून राज घुले, प्रणाली भालतडक, मयुरी तायडे, रिंकू थोर, पूजा मिसाळ, श्रुती दाभाडे, निकिता दाभाडे, शिवानी डांगे, निंबाजी वासनकार, गणेश कोथळकर व अभिजीत खंडाळे यांची निवड झाली.अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे, विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे, चर्चासत्रे, व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन करणे, तसेच विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राच्या व्यावहारिक ज्ञानाची जोड देणे, या उद्देशाने अभ्यास मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.सदर निवड प्रक्रियेचे संचालन प्रा. विनोद बावस्कर यांनी केले.

Previous Post Next Post