जळगाव जामोद(प्रतिनिधी);
ग्राहकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) जळगाव जामोद शाखेने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मृत ग्राहकाच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या आर्थिक मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी धुडे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.जळगाव जामोद येथील एसबीआयचे ग्राहक तुळशीबाई शिवा धुडे यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यांनी बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतले होते. त्यामुळे योजनेच्या नियमानुसार खाते नॉमिनी शिवा धुडे यांना 2 लाख रुपयांचा विमा लाभ देण्यात आला.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही केंद्र सरकारची विमा योजना असून, याद्वारे विमाधारकाच्या मृत्यूनंतर नियमानुसार नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपयांचा विमा लाभ दिला जातो. अशा योजनांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक प्रशासना तर्फे शाखा प्रबंधक श्री जयेश जिल्ठे यांनी केले.या छोटेखानी कार्यक्रमात एसबीआयचे शाखाधिकारी जयेश जिलठे, तोझम्मल हुसैन, महेंद्र उमाळे,विवेक जाधव.अक्षय जोशी, मयुरी कुळे, रश्मी टेकाडे आणि संगीता बेलोकर तसेच ग्राहक सेवा केंद्र जामोद चे संचालक महेंद्र जाधव ( विशेष सहकार्य) , शाकीर शेख आणि मंगेश लोखंडे उपस्थित होते.
