विद्यार्थ्यांच्या संगणकीय ज्ञानासाठी वन विभागाकडून संगणक संच भेट;धरूळ येथे आकोट वन्यजीव विभागाचा स्तुत्य उपक्रम...


 विद्यार्थ्यांच्या संगणकीय ज्ञानासाठी वन विभागाकडून संगणक संच भेट;धरूळ येथे आकोट वन्यजीव विभागाचा स्तुत्य उपक्रम...

सैय्यद शकिल/अकोट प्रतिनिधी 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, धरूळ येथील विद्यार्थ्यांसाठी एक संगणक संच भेट देण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, तसेच त्यांच्यामध्ये डिजिटल शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक माहिती मिळविणे, अभ्यास अधिक प्रभावीपणे करणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे शक्य होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, या दृष्टिकोनातून वन विभागाने हा उपक्रम हाती घेतला.या कार्यक्रमाला मा. जया एस. बगडे (STPF वनपरिक्षेत्र अधिकारी),वाजगे (वनरक्षक),कु.ध्रु्वे मॅडम (वनरक्षक ) शाळेचे प्राचार्य Vinod vaso तसेच शिक्षक  उपस्थित होते.वन विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख होऊन त्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. वन विभागाच्या या शैक्षणिक योगदानाचे शाळा व परिसरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post