अचलपूर बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र गोरले यांचे निधन; तालुक्यावर शोककळा...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा अचलपूर तालुक्यातील एकलासपुर येथील लोकनेते, शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी अग्रेसर असणारे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राजेंद्र गोरले यांचे आज शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक व अस्थिर बनली होती. उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अचलपूर तालुक्याने एक धडाडीचा, संघर्षशील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता गमावला आहे.
