पळशी सुपो नगरीत विराजमान झाली १८ फूट उंचीची भव्य दुर्गामाता!..३९ तासांचा सलग प्रवास करून दुर्गा मातेचे भव्य आगमन!


 पळशी सुपो नगरीत विराजमान झाली १८ फूट उंचीची भव्य दुर्गामाता!..३९ तासांचा सलग प्रवास करून दुर्गा मातेचे भव्य आगमन!

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

तालुक्यातील पळशी सुपो नगरीतील आसरा माता नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यंदा तब्बल १८ फूट उंचीची भव्य आणि देखणी दुर्गामातेची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. आपल्या आकर्षक रूपाने आणि भव्य उंचीने ही मूर्ती परिसरातील भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.या भव्य मूर्तीला पळशी सुपो येथे आणण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता बुरहानपूर येथून सुरू झालेला प्रवास १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पळशी सुपो येथे पोहोचला. अशा प्रकारे तब्बल ३९ तासांचा सलग प्रवास करून दुर्गामातेची भव्य मूर्ती गावात दाखल झाली.मूर्तीची उंची आणि भव्यता लक्षात घेता वाहतुकीदरम्यान विशेष नियोजन व काळजी घेण्यात आली. या कार्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. दुर्गामातेच्या आगमनासाठी ग्रामस्थ व मित्रपरिवारानेही सहकार्य केले.भव्यता, देखणेपणा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेली १८ फूट उंचीची दुर्गामातेची मूर्ती यंदाच्या नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

Previous Post Next Post