बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी....
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा.सौ.आदीती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई संदिप वाकेकर यांनी संग्रामपूर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत संस्थाचालक व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. आदीती ऋषिकेश पोहरे यांना मतपत्रिकेवर प्रथम पसंती क्रमांक देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.या प्रचार दौऱ्यादरम्यान सोनाळा येथील राष्ट्रसंत उदयसिंहजी महाराज कनिष्ठ कला महाविद्यालय,मौलाना असअद मदनी उर्दू हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोनाळा,संत सोनाजी महाराज महाविद्यालय सोनाळा,आदिवासी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टुनकी, इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर,शंकरगिरी विद्यालय पळशी झाशी तसेच गुलाब बाबा महाविद्यालय संग्रामपूर आदी शैक्षणिक संस्थांना भेटी देण्यात आल्या.यावेळी डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी संस्थाचालक व शिक्षकांशी संवाद साधत शिक्षकांच्या प्रश्नांवर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. आदीती ऋषिकेश पोहरे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.या प्रचार दौऱ्यावेळी पठाण सर, अभयसिंह मारोडे,प्रकाश देशमुख, राजेंद्र वानखडे, अजय अग्रवाल, जहीर अली, शंकरनाथ विश्वकर्मा, काशीनाथ मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
