जळगांव जामोद(प्रतिनिधी);
आदिवासी बहुल ग्राम उमापूर येथे नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित पारंपरिक कन्या पूजन सोहळ्याला उपस्थित राहून डॉ.अपर्णा कुटे यांनी कन्यांचे पूजन केले.भारतीय संस्कृतीत कन्येला साक्षात देवीचे स्वरूप मानले जाते. नवरात्रीच्या काळात केले जाणारे कन्या पूजन हे केवळ धार्मिक विधी नसून, स्त्रीशक्तीप्रती आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची पवित्र परंपरा आहे. प्रत्येक कन्येमध्ये आदिशक्तीचे रूप पाहत तिचा सन्मान करणे, तिच्या अस्तित्वाचे महत्त्व ओळखणे आणि समाजात मुलींबद्दल आदराची भावना रुजवणे, हाच या परंपरेमागील उदात्त विचार आहे.कन्या ही केवळ एका कुटुंबाची लेक नसते, तर ती समाजाच्या उज्ज्वल भविष्याची आशा असते. तिच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, तिच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि तिच्या आयुष्यातील असंख्य शक्यता जपणे, हीच खरी देवीची उपासना आहे.वरील कार्यक्रमला डॉ. अपर्णाताई कुटे , नगरसेविका लताताई तायडे व शिक्षक वृंद , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
